दादाजी कोंडदेव नगर परिसरात कचरा टाकणाऱ्या वाहनचालकावर गुन्हा दाखल
लातूर, 09 जुलै (हिं.स.)। महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कारवाईत दादाजी कोंडदेव नगरच्या पश्चिमेकडील परिसरात छोटा हत्ती वाहनातून कचरा टाकणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी
लातूर महानगरपालिका


लातूर, 09 जुलै (हिं.स.)।

महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कारवाईत दादाजी कोंडदेव नगरच्या पश्चिमेकडील परिसरात छोटा हत्ती वाहनातून कचरा टाकणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी व उपायुक्त वसुधा फड यांच्या आदेशानुसार, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक रवि कांबळे आणि स्वच्छता निरीक्षक शिवाजी कुटकर यांनी ही कारवाई केली.

कारवाई दरम्यान वाहन क्रमांक एमएच-२४-बीडब्ल्यू-१०२६ या छोटा हत्ती वाहनातून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यावेळी महापालिकेने शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. घरातील व दुकानातील कचरा नियमित घंटागाडीतच द्यावा. रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande