निमाच्या उपक्रमातून उद्योगांची एचएएलशी जोडणी
नाशिक, 09 जुलै (हिं.स.)। ’निमाच्या विकसित नाशिक अभियान २०२६’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत नाशिक निमाच्या पुढाकाराने दि. १० व ११ जुलै रोजी निमा हाऊस, सातपूर येथे एचएएल वेंडर डेव्हलपमेंट मीट आयोजित करण्यात आल्याची माहिती निमा अध्यक्ष आशिष नहार य
निमाच्या उपक्रमातून उद्योगांची एचएएलशी जोडणी


नाशिक, 09 जुलै (हिं.स.)।

’निमाच्या विकसित नाशिक अभियान २०२६’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत नाशिक निमाच्या पुढाकाराने दि. १० व ११ जुलै रोजी निमा हाऊस, सातपूर येथे एचएएल वेंडर डेव्हलपमेंट मीट आयोजित करण्यात आल्याची माहिती निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार, जि. १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

नाशिकला उत्पादन, संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पारंपरिक उद्योगांच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध विषयांवरील विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातील पहिला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे एचएएल वेंडर डेव्हलपमेंट मीट होय.

केंद्र सरकारच्या ’आत्मनिर्भर भारत अभियान’मुळे संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला मोठी चालना मिळाली आहे. एचएएल ही देशातील अग्रगण्य संरक्षण व एरोस्पेस कंपनी असून, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, इंजिने तसेच विविध संरक्षण उपकरणांच्या निर्मितीत तिचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याचबरोबर एचएएल आपल्या पुरवठा साखळीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देत आहे. यासंबंधी लागणार्या विविध उपकरणांचे प्रदर्शन करून एचएएलचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

देशभरातील हजारो एमएसएमई उद्योग एचएएलच्या पुरवठा साखळीशी जोडलेले असून, मशिनिंग, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रॉनिक घटक, अभियांत्रिकी सेवा, सुटे भाग आणि विविध उत्पादन प्रक्रियांसाठी स्थानिक उद्योगांना सातत्याने संधी मिळत आहेत. नाशिकमधील उद्योगांनाही या संधींचा अधिकाधिक लाभ मिळावा, एचएएलच्या वरिष्ठ अधिकार्यांशी थेट संवाद साधता यावा आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने या दोन दिवसीय वेंडर डेव्हलपमेंट मीटचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande