
नाशिक, 09 जुलै, (हिं.स.)। म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणी पोलिसांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपसंचालकांनाच अटक केली आहे या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्यात बिल्डरांकडून म्हाडा ला आर्थिक दुर्बल व इतर घटकांसाठी घर द्यावयाची असतात परंतु नाशिक मध्ये महानगरपालिकेची संधान साधून ही घर देण्यात आली नाही याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर म्हाडा कडून याबाबतची कारवाई करणारे पत्र देण्यात आले भूमी अभिलेख विभागाच्या वतीने त्याचा तपास सुरू करण्यात आला आणि यामध्ये जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारीच प्रथमदर्शनी दोषी आढळले . या सर्व प्रकरणांमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वतंत्र एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे सर्व साधारण आठ बिल्डर आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करत असताना महसूल विभागाने देखील स्वतंत्र तपासासाठी एस आय टीची स्थापना केलेली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांसह दोन बिल्डरांना अटक केलेली आहे या सर्व प्रकरणांमध्ये खोटे शिक्के सह्या आणि नकाशे बनवून देण्याच्या प्रकरणे या कार्यालयातील उपसंचालक श्रीकांत परदेशी यांना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अजून काय नवीन माहिती मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे कारण परदेशी हे खोटे शिक्के खोटे नकाशे बनवून देत होते हे आता समोर आलेला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV