आस्थापनांनी नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक मनुष्यबळ माहिती ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन सादर करावी
छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै (हिं.स.) : जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी जून 2026 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक मनुष्यबळ सांख्यिकी माहिती 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा
आस्थापनांनी नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक मनुष्यबळ माहिती ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन सादर करावी


छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै (हिं.स.) : जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी जून 2026 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक मनुष्यबळ सांख्यिकी माहिती 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिवचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जून 2026 अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी ईआर-1 नमुन्यातील सांख्यिकी माहिती संकलनाचे काम सुरू असून, या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व आस्थापनांचा शंभर टक्के प्रतिसाद अपेक्षित आहे. संबंधित विवरणपत्र निर्धारित मुदतीत ऑनलाइन सादर करून कायद्याचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा, 1959 तसेच नियम 1960 मधील तरतुदींनुसार सार्वजनिक क्षेत्रातील, शासकीय, निमशासकीय आणि संबंधित खाजगी आस्थापनांसह अधिनियमाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व खाजगी आस्थापनांनी प्रत्येक तिमाहीत कर्मचाऱ्यांची स्त्री, पुरुष व एकूण कर्मचारी संख्या नमुना ईआर-1 मध्ये सादर करणे बंधनकारक आहे.

सदर माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या महास्वयं रोजगार पोर्टलवर ऑनलाइन भरावयाची आहे. यासाठी संबंधित आस्थापनांना यापूर्वीच युजर नेम आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून, पोर्टलवर लॉगिन करून नोंदणीची माहिती पडताळून आवश्यक तपशील अद्ययावत करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहिती किंवा तांत्रिक मार्गदर्शनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande