
परभणी, 09 जुलै (हिं.स.)।
परभणी शहरासह परिसरात तसेच हिंगोली जिल्ह्यात आज ०९ जुलै रोजी पहाटे एका पाठोपाठ एक असे भूकंपाचे सौम्य चार झटके जाणवले आहेत.
पहाटे ०१:३७ वाजता भुंकपाचा पहिला सौम्य झटका जाणवला. तो, ४.६ रिश्टर स्केलचा एवढा होता. तर पहाटे ०२:१५ वाजता ३.६ रिश्टर स्केल व त्या पाठोपाठ ०२:१७ वाजता ३.९ रिश्टर स्केल तर 3.23 वाजता 4.1स्केलअसे लागोलाग चार सौम्य भुकंप धक्के जाणवले.
हिंगोली- नांदेड- परभणी या भागात अनेक नागरिकांनी हा अनुभवला. पहिला धक्का हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे याचे भुकंप केंद्र होते, यावेळेस भुकंप खोली १० किलोमीटर होती. तर दुसरे दोनही धक्के पांग्रा शिंदे गावाच्या पश्चिम- उत्तरेकडील काकडधाबा गावात यांचे केंद्र होते. व यांची खोली १० किलोमीटर नोंदली गेली.
गेल्या ११ एप्रिल २०२६ रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलवर भुकंपाची जाणीव पुन्हा झाली. अशी माहिती जेष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ तथा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएमविज्ञान केंद्राचे संचालक
श्रीनिवास एस. औंधकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis