माँट्रा इलेक्ट्रिक, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
नवी दिल्ली, 09 जुलै, (हिं.स.)।भारतातील सर्वसमावेशक इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन ब्रँड माँट्रा इलेक्ट्रिकने आज रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्यासोबत दोन सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी केली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळ (NCRP
Mou


नवी दिल्ली, 09 जुलै, (हिं.स.)।भारतातील सर्वसमावेशक इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन ब्रँड माँट्रा इलेक्ट्रिकने आज रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्यासोबत दोन सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी केली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळ (NCRPB) यांच्या धोरणाला पाठबळ म्हणून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील जुन्या ट्रक आणि बस यांच्या जागी भारत सरकारच्या सहाय्य योजनेअंतर्गत हे करार करण्यात आले. माँट्रा इलेक्ट्रिकच्या eMHCV आणि eSCV व्यवसायांनी MoRTH सोबतचे हे सामंजस्य करार नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केले.

NCRPB चे हे धोरण या प्रदेशात कार्यरत असलेल्या जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या (CV) बदलाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचा हा प्रारंभिक स्वीकार वाहनांमधून होणारे शून्य उत्सर्जन साध्य करून हवेची गुणवत्ता सुधारण्यास तसेच भारताच्या व्यापक कार्बनमुक्तीच्या उद्दिष्टांना पाठबळ देण्यास मदत करेल. माँट्रा इलेक्ट्रिकच्या दोन्ही व्यवसाय विभागांकडून पात्र फ्लीट ऑपरेटर्स आणि ग्राहकांना त्यांच्या उपाययोजना उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे संपूर्ण प्रदेशात अधिक स्वच्छ मालवाहतूक व्यवस्थेकडे होत असलेल्या बदलाला गती मिळेल.

हा उपक्रम माँट्रा इलेक्ट्रिकच्या व्यावसायिक वाहनांच्या सर्व विभागांसाठी उद्देशपूर्ण पद्धतीने विकसित केलेल्या इलेक्ट्रिक वाहनाने दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या व्यापक ध्येयाशी सुसंगत आहे. रायनो मालिकेअंतर्गत मध्यम आणि अवजड क्षमतेचे इलेक्ट्रिक ट्रक तसेच एव्हिएटर अंतर्गत लहान व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक अशा समर्पित उत्पादन पोर्टफोलिओमुळे, शाश्वत वाहतूक उपायांचा अवलंब करू इच्छिणाऱ्या फ्लीट ऑपरेटर्सच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी सक्षम स्थितीत आहे.

सरकारची ही वाहन-बदली योजना भारतातील सर्वाधिक प्रदूषित प्रदेशांपैकी एका प्रदेशात कार्यरत पारंपरिक आयसीई (अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE)) आधारित व्यावसायिक वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल तसेच इलेक्ट्रिक ट्रकच्या अधिक जलद स्वीकारासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यास मदत करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande