नांदेड - श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील पुलाचा भाग कोसळला
नांदेड, 09 जुलै (हिं.स.)। नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामामध्ये
Q


नांदेड, 09 जुलै (हिं.स.)। नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.

पुलाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य, निष्काळजीपणा अथवा अन्य कोणतीही अनियमितता झाली आहे का ?याची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

हा केवळ अपघात नाही, तर प्रशासकीय अनास्था आणि निकृष्ट दर्जाच्या कामाचा थेट नमुना आहे!

दळणवळणाच्या नावाखाली नागरिकांच्या डोक्यावर मृत्यूचे सापळे उभे केले जात आहेत का? प्रशासनाने केवळ पाहणी करण्याचे नाटक न करता, दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी. नागरिकांच्या सुरक्षेशी चाललेली ही क्रूर थट्टा थांबलीच पाहिजे!.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande