अमरावती - वन्यजीव पीक नुकसानभरपाई प्रक्रिया जनजागृती अभियान सुरू
अमरावती, 09 जुलै, (हिं.स.) - वन्यजीवांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना कायदेशीर भरपाई प्रक्रियेची माहिती देण्यासाठी माखला गावापासून ‘वन्यजीव पीक नुकसानभरपाई प्रक्रिया जनजागृती अभियान’ सुरू करण्यात आले. ग्रामसभेत शेतकऱ्यांशी संवाद साध
जनजागृती अभियानात सहभागीअधिकारी व शेतकरी


अमरावती, 09 जुलै, (हिं.स.) - वन्यजीवांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना कायदेशीर भरपाई प्रक्रियेची माहिती देण्यासाठी माखला गावापासून ‘वन्यजीव पीक नुकसानभरपाई प्रक्रिया जनजागृती अभियान’ सुरू करण्यात आले. ग्रामसभेत शेतकऱ्यांशी संवाद साधून भरपाई प्रक्रियेतील नियम, कालमर्यादा आणि शेतकऱ्यांचे हक्क, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथील शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉ. गुरुदास नुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते धनंजय सायरे हे मेळघाटात हा उपक्रम राबवत आहेत. ग्रामसभेत शेतकऱ्यांनी वन्यजीवांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असतानाही मिळणारी शासकीय भरपाई अत्यल्प असल्याची खंत व्यक्त केली. भरपाईसाठी वारंवार सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने अनेक शेतकरी अर्ज करण्यास टाळाटाळ करतात, असेही त्यांनी सांगितले.

सायरे यांनी वर्षातून एकदाच भरपाईसाठी अर्ज करता येतो, हा गैरसमज दूर करीत नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत अर्ज, १४ दिवसांत पंचनामा आणि त्यानंतर २६ दिवसांत भरपाई देण्याची शासकीय नियमावली स्पष्ट केली. मात्र, प्रत्यक्षात या कालमर्यादेचे पालन होत नसल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. वन्यजीवांमुळे झालेल्या नुकसानीची अचूक नोंद शासनापर्यंत पोहोचणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने आपला हक्क मागावा, असे आवाहन धनंजय सायरे यांनी केले. तसेच भरपाई अर्ज प्रक्रियेत शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande