प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुंबईकडे निघालेला ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडविला
नाशिक, 09 जुलै (हिं.स.)। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कुणालाही न कळवता मुंबईकडे निघालेला ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी गरवारे पॉईंट येथे अडवून आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करून देण्यात आल
Police stop tractor march


नाशिक, 09 जुलै (हिं.स.)।

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कुणालाही न कळवता मुंबईकडे निघालेला ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी गरवारे पॉईंट येथे अडवून आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करून देण्यात आले.

गुरुवारी (दि.९) सकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली अंबड,, सातपूर गौळाणे, आंबेबहुला, राजूर बहुला तसेच वडगाव पिंगळा चिंचोली dhakambe आडवनपारदेवीचे प्रकल्पग्रस्त शेतकरी त्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाला न कळवता मुंबईच्या दिशेने रवाना झाले. याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.त्यांनी गरवारे पॉईंट येथे बंदोबस्त लावून आंदोलकांचे ट्रॅक्टर अडविले.यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले.मात्र आंदोलक मुंबई मध्ये मंत्रालयावर जाण्यास ठाम होते.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ त्यांची बैठक एमआयडीसीचे प्रादेशिक अधीकारी दीपक पाटील यांच्याशी लावून देण्याचे कबुल केले.यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ट्रॅक्टरसह ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले.त्यानंतर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी पाटील यांच्यासोबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी पीएपी भूखंडाच्या ३२२ अर्जावर निर्णय घ्यावा,रिंग रोड संदर्भात बैठक घ्यावी,गौळाणे व आंबेबहुला परिसरातील रिंग रोडचा मार्ग बदलण्यात तसेच वडगाव पिंगळा चिंचोली, विना मोबदला भूसंपादन न करता आदी मागण्या मांडण्यात येऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री,महसूल मंत्री,उद्योगमंत्री यांच्याशी बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली.

पाटील यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मंत्र्यांशी बैठक आयोजित करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर,ऍड.कैलास खांडबहाले, भास्कर उगले,दौलत चुंबळे, संजय चुंबळे, संतोष सहाणे, मधुकर थापेकर, दत्तु थापेकर, ओंकार देशमुख आदींसह रिंगरोड बाधीत व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande