पुण्यातील कचरा डेपो दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा मृत्यू
जळगाव, 09 जुलै (हिं.स.)पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. या दुर्दैवी अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती
पुण्यातील कचरा डेपो दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा मृत्यू


जळगाव, 09 जुलै (हिं.स.)पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. या दुर्दैवी अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी असलेले भावेश मोहन वाणी (वय ३३) यांचे या दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले.

भावेश हे सध्या नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक होते. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच मूळ गाव असलेल्या शिरसोली परिसरासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.दिवंगत भावेश मोहन वाणी यांच्यावर आज, गुरुवार (दि. ९ जुलै २०२६) पुण्यातील रुपी नगर स्मशानभूमी, निगडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande