
नाशिक, 09 जुलै (हिं.स.)।
- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांमुळे शहरातील रस्ते, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप करत शिंदेसेनेने नाशिक महानगरपालिकेची विशेष महासभा बोलावण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात स्थायी समितीतील शिवसेनेचे चार सदस्य महापौरहिमगौरी आडके-आहेर यांना पत्र दिले असल्याची माहिती गटनेते अजय बोरस्ते यांनी दिली.
सिंहस्थाच्या विकास कामांना कोणाचाही विरोध नाही. मात्र या कामांच्या नावाखाली प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची केवळ मुजोरी सुरू आहे. अनेक ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने काम सुरू आहे. कोणत्याही ठेकेदारावर प्रशासनाकडून आजमितीस ठोस कारवाई केलेली नाही. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने प्रशासनाचे पितळ उघडे पाडले असून, याचा जाब विचारण्यासाठी विशेष महासेभची मागणी करण्यात येणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगत महापौरांना आज पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले.
याबाबत शिवसेना शिंदे गटाचे मनपा घटनेचे अजय बोरस्ते यांनी सांगितले की, स्थायी समिती सदस्यांमार्फत महापौरांना पत्र देऊन विशेष महासभेची मागणी केली जाणार आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा फटका नाशिककरांना बसतो आहे. केवळ बैठका घेऊन कामे होणार नाहीत. तर योग्य नियोजन असणे गरजेचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV