नाशिक : शिवसेना उबाठाचे मनपा आयुक्तांना निवेदन
नाशिक, 09 जुलै (हिं.स.) : नाशिक शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल, जागोजागी पडलेले खड्डे, त्यातून घडलेले अपघात, जखमी नागरिक तसेच शहरातील विविध भागांतील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज (गुर
नाशिक : शिवसेना उबाठाचे मनपा आयुक्तांना निवेदन


नाशिक, 09 जुलै (हिं.स.) : नाशिक

शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल, जागोजागी पडलेले खड्डे, त्यातून घडलेले अपघात, जखमी नागरिक तसेच शहरातील विविध भागांतील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज (गुरुवारी) महापालिका आयुक्त मनीषा खत्रींना निवेदन दिले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते आणि मनपा गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पाणी साचणे, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले.

दरम्यान, निवेदनातून खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांची दखल घेऊन तातडीने रस्ते दुरुस्ती, नुकसानग्रस्तांना मदत आणि पावसाळी आपत्कालीन उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande