
नांदेड, 09 जुलै (हिं.स.)।
सगरोळी येथील प्राथमिक शाळेत १९७७ साली चौथ्या इयत्तेत दाखल झालेले भगवान १९८७ साली १२ वी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले. याकाळात व्हॉलीबॉल, हॉकी यासारख्या खेळात राष्ट्रीय सहभाग घेत शाळेचे व स्वतःचे नाव उंचावले. यातूनच पुढे पोलीस दलात शिपाई पदावर भरती होऊन आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर नाईक, जमादार, सहा पोलीस निरीक्षक अशा बढती घेत सेवेच्या शेवटच्या पाच वर्षात पोलीस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
ते पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. संस्थेच्या बालकमंदिर येथील त्यांच्या वर्गमित्रांनी जिथून त्यांची जडणघडण झाली त्या सगरोळी संस्थेतच त्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा आयोजित केला होता. यानिमित्त अनेक विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेकडे आले. संस्थेच्या हायस्कूल विभागातील सर्व विद्यार्थी, अध्यापक, संस्था कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वसुंधरा सभागृहात गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे माजी विद्यार्थी तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक बा लाजी पाटील खतगावकर आणि संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी मोरे दांपत्याचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis