नांदेड नाका जलकुंभातून शुक्रवारी विविध भागांत पाणीपुरवठा.
लातूर, 09 जुलै (हिं.स.) : लातूर शहर महापालिकेअंतर्गत नांदेड नाका जलकुंभ येथील पाईपलाइन गळती दुरुस्ती तसेच पोलीस ट्रेनिंग सेंटर व पोलीस मुख्यालयासाठी पाणी वितरणाच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात य
पाणी पुरवठा


लातूर, 09 जुलै (हिं.स.) : लातूर शहर महापालिकेअंतर्गत नांदेड नाका जलकुंभ येथील पाईपलाइन गळती दुरुस्ती तसेच पोलीस ट्रेनिंग सेंटर व पोलीस मुख्यालयासाठी पाणी वितरणाच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

कचरू कांबळे यांच्या कार्यक्षेत्रातील सिद्धार्थ सोसायटी, अन्सार कॉलनी, नाथनगर, गाजीपुरा, स्वातंत्र्य सैनिक नगर, रमाबाई नगर, बरकत नगर, ताजोद्दीन बाबा रोडचा काही भाग, हरीभाऊ नगर, पंचशील चौक व परिसरातील इतर भागांत पाणीपुरवठा होईल. नामदेव कांबळे यांच्या कार्यक्षेत्रातील बालाजी नगर, मसोबा नगर, कुष्ठधाम, महादेव नगर, करीम नगर, नूरजहाँ कॉलनी व प्रबुद्ध नगर येथेही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच इरफान शेख यांच्या कार्यक्षेत्रातील महाडा कॉलनी, मनियार नगर, आंजली नगर, चलवाड नगर, इस्लामपुरा आदी भागांना पाणीपुरवठा करण्यात येईल.

नांदेड नाका जलकुंभातील उपलब्ध पाण्याच्या पातळीनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता मा. चव्हाण यांनी केले आहे. शाखा अभियंता प्रवीण राजे व जलकुंभ प्रमुख दिलीप गायकवाड यांनीही नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande