विम्बल्डन 2026 : नोस्कोव्हा आणि कोस्त्युक यांची पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक
लंडन, 09 जुलै (हिं.स.) । चेक टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हाने विम्बल्डन स्पर्धेत इतिहास रचला. २१ व्या वर्षी लंडनमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारणारी ती सर्वात तरुण टेनिसपटू ठरली आहे. लिंडाने एलिस मर्टेन्सचा ६-३, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मार्ता कोस्त्युक


लंडन, 09 जुलै (हिं.स.) । चेक टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हाने विम्बल्डन स्पर्धेत इतिहास रचला. २१ व्या वर्षी लंडनमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारणारी ती सर्वात तरुण टेनिसपटू ठरली आहे. लिंडाने एलिस मर्टेन्सचा ६-३, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. २०१० मध्ये पेट्रा क्विटोव्हानंतर विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारी ती सर्वात तरुण टेनिसपटू ठरली आहे.

मर्टेन्सवरील या महत्त्वपूर्ण विजयानंतर, नवव्या मानांकित लिंडाने दोन वेळा विम्बल्डन विजेती ठरलेल्या क्विटोव्हाच्या पावलावर पाऊल टाकण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली की, मला तिच्या पावलावर पाऊल ठेवायला नक्कीच आवडेल. जर निकालही तसाच लागणार असेल, तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही नसेल.दुसरीकडे, २०२४ च्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या जस्मिन पाओलिनीचा पराभव करून मार्ता कोस्त्युकनेही उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. महिलांच्या गटातील एकमेव माजी अंतिम फेरी गाठणाऱ्या पाओलिनीला आणखी एका चेक टेनिसपटूने स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे २००० सालापासून विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठणाऱ्या चेक महिला टेनिसपटूंची एकूण संख्या आठ झाली आहे, जी इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. कोस्त्युकने पाओलिनीचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

सामन्यानंतर, १२ व्या मानांकित कोस्त्युकने कबूल केले की, मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी तिने सेंटर कोर्टवर फेरफटका मारला होता. ती म्हणाली की, देवाचे आभार की माझ्या प्रशिक्षकाने मला काल इथे फिरवले. इथले प्रवेशद्वार आणि आतील सर्व काही पाहून मी थक्क झाले होते. मला वाटले, व्वा! जे पाहिले त्यातून सावरण्यासाठी मला एक दिवस हवा आहे. नऊ वर्षांपूर्वी मी प्रेक्षक म्हणून या कोर्टवर आले होते आणि रॉजर फेडररचा खेळ पाहिला होता. तो अनुभव खूप खास होता. आता खेळाडू म्हणून इथे परतणे, सेंटर कोर्टवर अभिमानाने चालणे आणि तो क्षण अनुभवणे... आणि आता विजयानंतर मी इथे उभी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande