यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’
यवतमाळ, 09 जुलै (हिं.स.) जिल्ह्यात मंगळवारी पावसाने उसंत घेतली होती. परंतु पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बुधवारी (ता. आठ) सकाळी ढगाळी वातावरण होते आज सकळ पासून ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या जिल्ह्यात कुठेही पाऊस पडलेला नाही . सलग
जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’


यवतमाळ, 09 जुलै (हिं.स.) जिल्ह्यात मंगळवारी पावसाने उसंत घेतली होती. परंतु पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बुधवारी (ता. आठ) सकाळी ढगाळी वातावरण होते आज सकळ पासून ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या जिल्ह्यात कुठेही पाऊस पडलेला नाही . सलग कोसळणार्!या पावसामुळे आतापर्यंत खरीप हंगामातील ८० टक्क्याहून अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा पावसाचा खंड हा चिंतेचा विषय बनला होता. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्!यांनी मशागती आटोपून घेतल्या होत्या. तर पेरणीच्या दृष्टीने आवश्यक असलेले बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचीसुद्धा खरेदी केली होती. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याने जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले.

अवघ्या काही दिवसांतच पावसाने संपूर्ण जिल्हा व्यापला होता. मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. नदी, नाले ओसंडून वाहत होते. प्रकल्पातील जलसाठ्यातसुद्धा वाढ झाली. जिल्ह्यातील ११० मंडळात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्!यांनी पेरण्यांच्या लगबगीला सुरवात केली. आजघडीस जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, ऊस, भाजीपाला आदी पिकांच्या लागवडी आटोपून घेतल्या आहेत. जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस कोसळत आहे. अशात मंगळवारी पावसाने उसंत घेतली होती. परंतु, पुढील दोन दिवस हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला. बुधवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण होते. तर दुपारी एक वाजताच्या सुमारास तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सायंकाळपर्यंत अधूनमधून पाऊस सुरूच होता. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्!यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

वातावरणात उकडा अद्यापही कायम

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्याभरात पाऊस कोसळतच आहे. असे असले तरी वातावरणात अद्यापही बदल झाला नाही. पाऊस पडल्यानंतर काहीवेळासाठी गारठा निर्माण होत आहे. परंतु, त्यानंतर पुन्हा उकाडा जाणवत आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता जून महिन्यातील पावसाची तूट जुलैमध्ये निघेल की नाही, ही येणारी वेळच सांगेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande