
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून रुपेश थडसरे याला अटक केली. आरोपीकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना अमली पदार्थांची बाळगणूक आणि विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान संशयिताच्या ताब्यातून अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले.या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करीत असून, शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड