अकोला: लैंगिक शोषण आणि मृत्यू प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला अटक
अकोला, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अकोल्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक शोषण करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अखेर तेरा दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पवन उद्धवराव
Photo


अकोला, 03 ऑगस्ट (हिं.स.)। अकोल्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक शोषण करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अखेर तेरा दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पवन उद्धवराव वडगावे असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी पवन यांनी घर मालकाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. पोलीस कर्मचाऱ्याने नंतर लग्नाला नकार दिल्याने पीडितेने १३ जून २०२६ रोजी गळफास घेतला. तब्बल 42 दिवस कोमात राहिल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन १३ दिवस झाले तरी संबंधित नराधम पोलीस अद्यापही फरारच होता. या प्रकरणी जनमानसातून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. मोर्चाही काढण्यात आला होता.. अखेर तब्बल तेरा दिवसानंतर पोलिसांनी पवन वडगावे याला बेड्या ठोकल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande