अमरावतीत चाकूचा धाक दाखवून मद्यव्यावसायिकाकडे हप्त्याची मागणी
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)| शहरात दादागिरी करुन खंडणी वसुलीचे प्रकार कथित व स्वयंघोषित दादांकडून सुरूच आहे. फ्रेजरपुरा हद्दीतील एका कथित दादाने एका मद्यव्यावसायीकाला चाकूचा धाक दाखवून हप्ता न दिल्यास दुकानात तोडफोड करण्याची धमकी दिली. सौरभ उर्फ गुड
अमरावतीत चाकूचा धाक दाखवून मद्यव्यावसायिकाकडे हप्त्याची मागणी


अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)| शहरात दादागिरी करुन खंडणी वसुलीचे प्रकार कथित व स्वयंघोषित दादांकडून सुरूच आहे. फ्रेजरपुरा हद्दीतील एका कथित दादाने एका मद्यव्यावसायीकाला चाकूचा धाक दाखवून हप्ता न दिल्यास दुकानात तोडफोड करण्याची धमकी दिली. सौरभ उर्फ गुड्ड्या उर्फ पुष्पा रवी गाडेकर (वय २३, रा. सिद्धार्थनगर, फ्रेजरपुरा) असे धमकी देणाऱ्या कथित दादाचे नाव असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली.

संशयित सौरभविरुद्ध विविध स्वरूपाचे आधीचेही गुन्हे दाखल आहे. त्याने संतोष मनोहरलाल जयस्वाल यांच्या देशी दारूच्या दुकानात जाऊन महिन्याला हप्ता द्यावा लागेल. मी या एरियाचा दादा असल्याची धमकी त्याने दिली. मद्यव्यावसायीक जयस्वाल यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता, संशयित सौरभ गाडेकर याने दुकानात तोडफोड करून निघून गेला. ज्यावेळी संशयित दुकानात आला तेव्हा त्याने जयस्वाल यांच्या मानेला चाकू लावून हप्त्याची मागणी केली होती. संतोष जयस्वाल यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात संशयित सौरभ विरुद्ध खंडणी मागुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

हद्दपार असतानाही दादागिरी संशयित सौरभ रवी गाडेकर याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. आदेश झुगारून तो शहरात दाखल झाला. फ्रेजरपुरा पोलिसांनी आज त्याला अटक केली. झडती घेतली असता, त्याच्याकडून एक धारदार चाकूही जप्त केल्याने आर्मअॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला. पकडल्यानंतर खंडणीची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांनी सौरभ गाडेकर याल पकडल्यानंतर मद्यव्यावसायिक संतोष जयस्वाल यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात धाव घेऊन त्यांच्या दुकानात तोडफोड करून हप्त्याची मागणी केली होती. अशी तक्रार नोंदविल्याने सौरभविरुद्ध आर्मअॅक्ट पाठोपाठ खंडणीचा दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला. असे पोलिस उपनिरीक्षक राहुल महाजन यांनी सांगितले.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande