
नाशिक, 16 ऑगस्ट (हिं.स.)
- शहरातील नाशिक रोड परिसरामध्ये एमडी ड्रग्स विक्रीच्या प्रकरणातून जेलमध्ये असलेल्या आरोपीच्या भावावरती गोळीबार करून हत्या करण्यात आल्याचे घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमास घडली. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींच्या शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरामध्ये ड्रग्स विक्रीच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावरती तेजी आलेली होती त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विविध भागांमध्ये छापे टाकून यातील सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्याचे सत्र सुरू केले होते या प्रकरणांमध्ये सनी पगारे नामक व्यक्तीला एमडी ड्रग्स
विक्री करताना पकडण्यात आलेले होते. सध्या सनी पगारे हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त आहे.
या प्रकरणातून रविवारी नाशिक मध्ये खळबळ उडवणारे प्रकरण घडले असून सनी पगारे याचा भाऊ सुमित पगारे याच्यावरती नाशिक रोड विभागीय कार्यालयाच्या जवळ उभा असताना गोळीबार करण्यात आला त्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला त्याला जवळच्या बीटकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI