
बीड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। वडवणी तालुक्यात शेतामध्ये बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी कारवाई करत गांजाची झाडे जप्त केली असून संबंधितांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
वडवणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेताची पाहणी करून छापा टाकण्यात आला. यावेळी शेतात गांजाची झाडे लागवड करून त्यांची जोपासना केल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून गांजाची झाडे जप्त केली.या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अमली पदार्थांची अवैध लागवड व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत. बीड जिल्ह्यात यापूर्वीही शेतांमध्ये गांजाची लागवड केल्याच्या घटना समोर आल्या असून, पोलिसांकडून अशा कारवायांना आळा घालण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis