झिम्बाब्वेत भीषण फेरी दुर्घटना: मृतांचा आकडा ७२ वर, १८ मुलांचा समावेश
हरारे, 16 ऑगस्ट (हिं.स.)।झिम्बाब्वेमध्ये करिबा सरोवरात एक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी फेरी बोट उलटल्याने ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १८ मुलांचा समावेश आहे. शनिवारी बचाव पथकाने आणखी अनेक प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले. त्यान
झिम्बाब्वेत भीषण फेरी दुर्घटना: मृतांचा आकडा ७२ वर, १८ मुलांचा समावेश


हरारे, 16 ऑगस्ट (हिं.स.)।झिम्बाब्वेमध्ये करिबा सरोवरात एक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी फेरी बोट उलटल्याने ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १८ मुलांचा समावेश आहे. शनिवारी बचाव पथकाने आणखी अनेक प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी ७२ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली.

ही फेरी मंगळवारी मोठ्या लाटांमुळे उलटली होती. पोलिसांनी सांगितले की, आणखी २६ मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा ७२ वर पोहोचला आहे.ही दुर्घटना मंगळवारी घडली. दुर्घटनाग्रस्त फेरीचे संचालन एका सरकारी संस्थेकडून केले जात होते. करिबा सरोवराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना किनाऱ्यावर असलेल्या करिबा शहरात ने-आण करण्यासाठी या फेरीचा वापर केला जात होता. फेरीमध्ये सुमारे १५३ प्रवासी असल्याचा अंदाज आहे, तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या फेरीची क्षमता केवळ ९० प्रवाशांची होती.

झिम्बाब्वेच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ७७ जणांना वाचवण्यात आले. बचावलेल्या नागरिकांना सरोवरातील एका छोट्या बेटावर नेण्यात आले असून, त्यांना तेथून परत आणण्यासाठी नौका पाठवण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितले होते की, फेरीमध्ये किती मुले होती, याची निश्चित माहिती उपलब्ध नव्हती. कारण तिकीट घेण्याच्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलांची प्रवाशांच्या संख्येत नोंद केली जात नव्हती. मात्र, नंतर जारी करण्यात आलेल्या पोलिसांच्या यादीतून समोर आले की, मृतांमध्ये १६ मुले १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची होती. त्यापैकी सर्वात लहान मूल अवघ्या एक वर्षाचे होते.

करिबा सरोवर हे जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित सरोवरांपैकी एक आहे. १९५० च्या दशकाच्या अखेरीस आणि १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला झाम्बेझी नदीवर धरण बांधून हे सरोवर तयार करण्यात आले. हे सरोवर २०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे असून काही ठिकाणी त्याची रुंदी ४० किलोमीटरपर्यंत आहे. झिम्बाब्वे आणि झाम्बिया हे दोन्ही देश करिबा सरोवर सामायिक करतात आणि या सरोवरातून दोन्ही देशांची सीमा जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande