मुंबईत नौदलातील एका कर्मचाऱ्याच्या घरी चार मृतदेह आढळल्याने खळबळ
मुंबई, 16 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील नेव्ही नगर येथील त्यांच्या घरात भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्यासह, त्याची पत्नी आणि दोन लहान मुले मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलांचे वय अनुक्रमे दोन महिने आणि तीन वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. नेव्ही
Mumbai  Colaba four dead bodies were found house of a naval employee


मुंबई, 16 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील नेव्ही नगर येथील त्यांच्या घरात भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्यासह, त्याची पत्नी आणि दोन लहान मुले मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलांचे वय अनुक्रमे दोन महिने आणि तीन वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. नेव्ही नगर पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी नेव्ही नगर येथील नौदल निवासस्थानातून एका कर्मचाऱ्यासह, त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. दोन मुलांच्या मृत्यूमागील परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक दृष्ट्या, मुलांना विषबाधा झाल्याचा संशय आहे. तथापि, शवविच्छेदन आणि फोरेंसिक तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल.

पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक फोरेंसिक पुरावे गोळा केले असून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थिती आणि घटना निश्चित करण्यासाठी तपास अधिकारी कुटुंबीय, शेजारी आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवत आहेत.

भारतीय नौदलाने या घटनेला दुःखद म्हटले असून, १५ ऑगस्ट रोजी कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये एका कर्मचाऱ्याने त्याच्या कुटुंबासह घरी मृतावस्थेत आढळला, असे सांगितले. नौदलाने सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, नौदल तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande