पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थान सज्ज; लाखो भाविक दाखल
त्रंबकेश्वर, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या उत्सव येत असल्यामुळे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये लाखो भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी बारा ज्योर्
पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थान सज्ज; लाखो भाविक दाखल


त्रंबकेश्वर, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या उत्सव येत असल्यामुळे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये लाखो भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे.

पहिल्या श्रावणी सोमवारी बारा ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या परिक्रमासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टसह प्रशासनाने नियोजन केले असून खासगी वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी ((दि. १६)) सुटीचे औचित्य साधत भाविकांसह पर्यटकांनी त्र्यंबकेश्वर येथे प्रचंड गर्दी केली हेती.

दर्शनासाठी सुमारे आठ तासांची प्रतीक्षा करावी लागत होती. जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरही भाविकांची दर्शनासाठी गर्दी लोटली होती. शनिवारी स्वातंत्र्य दिन आणि रविवारची सुट्टी यामुळे त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी धर्मदर्शनाची रांग पूर्व गेटवरील दर्शन मंडपाबाहेरून थेट वैकुंठधाम मार्गे निरंजनी आखाड्यापर्यंत पोहोचली होती. या रांगेतून दर्शन घेण्यासाठी भाविकांना

तब्बल सात ते आठ तास प्रतीक्षा करावी लागली.

२०० रुपये देणगी दर्शन रांगही दर्शन मंडपाच्या बाहेरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला वळसा घालत थेट बसस्थानकापर्यंत गेली होती. या रांगेतून दर्शनासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागत होता. अति तातडीच्या दर्शनाची रांगदेखील मंडपाबाहेर लागली होती. कुशावर्त तीर्थावर स्नानासाठीही भाविकांनी गर्दी केली होती

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande