स्पेनच्या स्यूटात घुसखोरीचा प्रयत्न; २९४ स्थलांतरितांसह ६१ मोरोक्कन नागरिकांना अटक
मैड्रिड, 17 ऑगस्ट (हिं.स.)।मोरोक्कोच्या सुरक्षा दलांनी जमीन आणि समुद्रमार्गे स्पेनच्या स्यूटा या भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेकडो स्थलांतरितांना अटक केली आहे. गरिबी आणि चुकीच्या माहितीमुळे हजारो स्थलांतरितांनी स्यूटाकडे धाव घेतल्याच्या
स्पेनच्या स्यूटात घुसखोरीचा प्रयत्न; २९४ स्थलांतरितांसह ६१ मोरोक्कन नागरिकांना अटक


मैड्रिड, 17 ऑगस्ट (हिं.स.)।मोरोक्कोच्या सुरक्षा दलांनी जमीन आणि समुद्रमार्गे स्पेनच्या स्यूटा या भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेकडो स्थलांतरितांना अटक केली आहे. गरिबी आणि चुकीच्या माहितीमुळे हजारो स्थलांतरितांनी स्यूटाकडे धाव घेतल्याच्या घटनेनंतर अवघ्या दोन आठवड्यांनी ही ताजी घुसखोरीची घटना घडली आहे. हा या भागातील सर्वात गंभीर स्थलांतर संकटांपैकी एक होता. अधिकृत आकडेवारीनुसार, सीमेच्या दोन्ही बाजूंना ९० जणांचा मृत्यू झाला होता.

मोरोक्कोच्या सरकारी प्रसारकने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी स्यूटामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उप-सहारा आफ्रिकेतील २९४ स्थलांतरितांना अटक करण्यात आली. स्थलांतरितांना सीमा ओलांडण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली ६१ मोरोक्कन नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर मोरोक्कोच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर असलेल्या स्पेनच्या स्यूटा शहरात जाण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर सीमा ओलांडण्याचे हे प्रयत्न झाले. त्यानंतर मोरोक्को आणि स्पेनच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, त्या भागाकडे होणारी लोकांची ये-जा मर्यादित केली आहे.

गृह मंत्रालयाने ताज्या अटकांबाबत किंवा स्थलांतरितांचा हा नवा प्रयत्न रोखण्यासाठी सीमेवर तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, मोरोक्कोच्या एका वरिष्ठ राजनयिकाने यापूर्वी सांगितले होते की, स्यूटालगतच्या सीमेवर दररोज २० हजारांहून अधिक मोरोक्कन सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. या सुरक्षा व्यवस्थेवर कोट्यवधी डॉलर खर्च केला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande