‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज
28 ऑगस्टला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार प्रदर्शित मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.)। अभिनेता बरुण सोबतीच्या आगामी ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ या चित्रपटाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. नुकताच वेब सीरिज ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये दिसलेला बरुण आता या तपासप्रधान ड्रा
First Poster of the Film ‘Babita Singh Reporting’ Released


28 ऑगस्टला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार प्रदर्शित

मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.)। अभिनेता बरुण सोबतीच्या आगामी ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ या चित्रपटाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. नुकताच वेब सीरिज ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये दिसलेला बरुण आता या तपासप्रधान ड्रामाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाची घोषणा करण्यासोबतच त्याचे पहिले पोस्टरही जारी केले आहे. चित्रपटात बरुण सोबतीसोबत निमिषा सजयन आणि अंशुमान पुष्कर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

अंबिएका पंडित यांच्या दिग्दर्शनाखाली आणि अमिता व्यास यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ची निर्मिती सौरभ मल्होत्रा, मनुज मित्रा आणि टीना थारवानी यांनी फिल्म स्क्वाड प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली केली आहे. चित्रपटाची कथा बबिता सिंह उर्फ ‘बेबी’ नावाच्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते, जिला तिच्या विभागात आणि समाजात सतत कमी लेखले जाते. मात्र, एका हत्येच्या तपासादरम्यान तिच्या निलंबनानंतर कथेत मोठे वळण येते.

चित्रपटात हत्येचे गूढ उकलण्यासोबतच बबिताचे वैयक्तिक आयुष्य आणि कौटुंबिक संघर्षांनाही कथेचा महत्त्वाचा भाग बनवण्यात आला आहे. ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ 28 ऑगस्ट 2026 रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून, जगभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. तपासप्रधान कथा, महिला पोलिस अधिकाऱ्याचा संघर्ष आणि सामाजिक दबाव यांच्यामध्ये चित्रपट आपली कथा कोणत्या पद्धतीने पुढे नेतो, हे त्याच्या प्रदर्शनानंतर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande