१५ वर्षांनंतर पुन्हा रंगणार मैत्रीची गोष्ट; ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सिक्वेलची घोषणा
मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)। झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे काम सुरू झाल्याची पुष्टी खुद्द दिग्दर्शिकेने क
रोशन


मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)। झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे काम सुरू झाल्याची पुष्टी खुद्द दिग्दर्शिकेने केली आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि हृतिक रोशन, फरहान अख्तर व अभय देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने मैत्री, नातेसंबंध आणि आयुष्य मनसोक्त जगण्याचा संदेश देत प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. यावर आता झोया अख्तर यांनी अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.

एका संभाषणादरम्यान झोया यांनी सांगितले की, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २' वर काम सुरू आहे. मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले की, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये पुढे जाण्यापूर्वी त्याची कथा आणि त्यातील पात्रे आजच्या काळाशी सुसंगत असतील याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, या पात्रांना पुन्हा पडद्यावर आणणे हे कथानकाच्या दृष्टीने योग्य ठरेल का, याचा विचार सध्या त्यांची टीम करत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, केवळ जुन्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, कथा आणि पात्रांना साजेसा असाच हा सिक्वेल साकारला जाईल.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ 'मध्ये हृतिकने 'अर्जुन', फरहानने 'इम्रान' आणि अभय देओलने 'कबीर'ची भूमिका साकारली होती. स्पेनमधील सहलीदरम्यान आयुष्य, प्रेम आणि नातेसंबंधांबाबत या तीन मित्रांमध्ये झालेले वैचारिक बदल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील स्थित्यंतरे यामुळे या चित्रपटाला एक वेगळी ओळख मिळाली होती. या चित्रपटात कतरिना कैफ, कल्की कोचलिन आणि नसीरुद्दीन शाह यांचाही सहभाग होता. आता १५ वर्षांनंतर या मूळ पात्रांच्या कथा कशा पुढे सरकतील आणि मूळ कलाकार पुन्हा एकत्र येतील का, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande