टेम्पसेंस इंस्ट्रुमेंट्स (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ २० ऑगस्टला सब्सक्रिप्शनसाठी होणार खुला
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.)। टेम्पसेंस इंस्ट्रुमेंट्स (इंडिया) लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) २० ऑगस्टला सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार २४ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतात. अँकर गुंतवणूकदार १९ ऑ
Tempsens Instruments Limiteds IPO


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.)। टेम्पसेंस इंस्ट्रुमेंट्स (इंडिया) लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) २० ऑगस्टला सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार २४ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतात. अँकर गुंतवणूकदार १९ ऑगस्टला बोली लावू शकतात. यासाठी किंमत श्रेणी (प्राईस बँड) २८५-३०० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

टेम्पसेंस इंस्ट्रुमेंट्स (इंडिया) लिमिटेडच्या ६५० कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये सुमारे ९५ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स तसेच १.८५ कोटी शेअर्सची विक्री ऑफर (ओएफएस) समाविष्ट आहे. गुंतवणूकदार यामध्ये कमीत कमी ५० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५० च्या पटीत बोली लावू शकतात. कंपनीची योजना आहे की, या इश्यूमधून उभारलेल्या रकमेचा वापर भांडवली खर्चासाठी, कर्ज फेडण्यासाठी आणि कंपनीच्या सामान्य कामकाजासाठी केला जाईल. कंपनीचा शेअर २८ ऑगस्टला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे.

१९९० मध्ये स्थापन झालेली टेम्पसेंस इंस्ट्रुमेंट्स (इंडिया) लिमिटेड ही एक प्रमुख थर्मल इंजिनिअरिंग आणि स्पेशल केबल सोल्युशन्स पुरवणारी कंपनी आहे. ३१ मार्चपर्यंत भारतात फायबर ऑप्टिक टेम्परेचर सेन्सर आणि थर्मल प्रोफायलिंग सिस्टिम्स तयार करणारी ही एकमेव कंपनी आहे. तसेच फायस्कल इयर २०२६ मध्ये भारतात पायरोमीटर आणि ऑनलाइन थर्मल इमेजर तयार करणारी ही एकमेव कंपनी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande