
वॉशिंग्टन, 17 ऑगस्ट (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओमानला इशारा दिला आहे. इराणसोबतच्या संघर्षादरम्यान ओमानने स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये अडथळा निर्माण केल्यास त्याच्यावर जोरदार बॉम्बहल्ले करण्यात येतील, अशी धमकी दिली आहे. सोमवारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.
ट्रम्प म्हणाले, “जर ओमान मध्ये आला, तर आम्ही त्यांच्यावर जबरदस्त बॉम्बहल्ला करू.”गेल्या काही आठवड्यांपासून इराणचे राजनयिक ओमानच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी तात्पुरता करार करण्याच्या उद्देशाने या चर्चा सुरू आहेत.
इराण आणि ओमानदरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीच्या नियंत्रणाबाबत सुरू असलेल्या चर्चेविषयी ट्रम्प यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.पत्रकार यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीबाबत ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, ट्रम्प यांनी इराणने शरणागतीचे पांढरे निशाण फडकवावे, असे म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले, “ते चांगले पोकर खेळाडू आहेत, पण आता त्यांचा अंत जवळ आला आहे.”
ट्रम्प यांनी पुढे स्पष्ट केले, “माझ्याकडे कोणतीही अंतिम मुदत नाही. मला घाई नाही. मध्यावधी निवडणुकांचा माझ्या विचारांशी काहीही संबंध नाही.” ‘ट्रुथ सोशल’वरील एका स्वतंत्र पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले की, इराणकडे कधीही अण्वस्त्रे राहू नयेत, हे अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट असेल. त्यांनी लिहिले, “सर्वात मोठे लक्ष्य हेच आहे आणि कायम हेच राहील की, इराणकडे कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे असू नयेत.”
अमेरिका आणि इराण यांच्यातील ६० दिवसांचा युद्धविराम संपण्याच्या काही दिवस आधी ट्रम्प यांनी ही वक्तव्ये केली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode