गडचिरोली - जंगलात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड; १.५० कोटींच्या मुद्देमालासह ३४ अटकेत!
गडचिरोली, 17 ऑगस्ट (हिं.स.) गडचिरोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिलेल्या कडक आदेशानंतर, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कोटगुल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. ना
जुगार अड्ड्यावरील धाडीत पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी


गडचिरोली, 17 ऑगस्ट (हिं.स.)

गडचिरोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिलेल्या कडक आदेशानंतर, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कोटगुल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. नांगपूर जंगल परिसरात सुरू असलेल्या या कारवाईत पोलिसांनी

३४ आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून १ कोटी ५० लाख ९७ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई नांगपूर जंगल परिसरात.१७ ऑगस्ट २०२६, रात्री सुमारे ०२:०० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम: ₹४,४१,५००/-

२३ चारचाकी वाहने,५दुचाकी वाहनेइतर साहित्यामध्ये पत्ते,स्टीलची पेटी, बॅटरी, ताडपत्री.आदींचा समावेश आहे

असा उघडकीस आला अड्डा:

नांगपूर येथील परमेश्वर लोहंबरे आणि कोटगुल येथील मिथुन तांबेकर हे दोघे जंगलात लोकांना जमवून पैशांची हार-जीत लावणारा जुगाराचा खेळ चालवत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सपोनि. भगतसिंग दुल्हत, पोउपनि. विवेक वायकर आणि पोलीस पथकाने दोन पंचांसह जंगलात छापा टाकला.

पोलीस आल्याचे पाहताच जुगारी पळू लागले, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत राजनांदगाव (छत्तीसगड) येथील बीरेंद्र कुमार सिन्हा व प्रकाश कुमार मेश्राम यांच्यासह एकूण ३४ जणांना घेराव घालून ताब्यात घेतले.

३६ जणांवर गुन्हा दाखल, मुख्य सूत्रधार फरार: या प्रकरणी कोटगुल पोलीस ठाण्यात अप. क्र. ००८/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एकूण ३६ आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जुगार चालवणारे मुख्य आयोजक परमेश्वर लोहंबरे आणि मिथुन तांबेकर हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. विवेक वायकर करत आहेत.

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुल्हत, पोउपनि. विवेक वायकर व पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande