शिरसोलीतील घरफोडीचा जळगाव पोलिसांनी लावला छडा; तिघे संशयित ताब्यात
जळगाव, 17 ऑगस्ट (हिं.स.)| शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना सातत्यानं समोर येत असून अशातच जळगाव एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावला असून, तीन संशयित आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी
शिरसोलीतील घरफोडीचा जळगाव पोलिसांनी लावला छडा; तिघे संशयित ताब्यात


जळगाव, 17 ऑगस्ट (हिं.स.)| शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना सातत्यानं समोर येत असून अशातच जळगाव एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावला असून, तीन संशयित आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून रोकड, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शिरसोली येथील रहिवासी राजेंद्र दौलत आंबाडकर हे ३० एप्रिल रोजी रात्री घर बंद करून बाहेरगावी गेले होते. ५ मे रोजी सकाळी ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे आढळून आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान या घरफोडीत तीन संशयितांचा सहभाग असल्याचे समोर आले.

पोलिसांनी मुन्ना शहा सुलतान शहा (२२, रा. होळकापूर पोलीस चौकी, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेतले. मुस्तकीन ऊर्फ जुनेद भिकन शहा (२३, रा. तांबापुरा, जळगाव; हल्ली रा. शिरसोली) याला बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी धाड परिसरातून पकडण्यात आले. तर जाबीर शहा जावेद शहा (२०, रा. मुस्लिम कॉलनी, बडी खानजवळ, भुसावळ) याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले.तपासादरम्यान आरोपींकडून १० हजार रुपये रोकड, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी मुस्तकीन ऊर्फ जुनेद शहा याच्याविरुद्ध यापूर्वी रामानंदनगर, पाळधी, भुसावळ आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर घरफोडी करणाऱ्या टोळीविरुद्ध झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande