अभिनेता अजय देवगन चिरंजीवासह त्र्यंबक राजाच्या चरणी लीन
त्र्यंबकेश्वर, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। श्रावण मास चालू असल्यामुळे सिने अभिनेता अजय देवगन हा आपल्या मुलासह मंगळवारी त्रंबकेश्वर राजाच्या चरणी लीन झाला अचानक मंदिरामध्ये अजय देवगन ला बघून भक्तगणांमध्ये देखील आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
Cine actor Ajay Devgan


त्र्यंबकेश्वर, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। श्रावण मास चालू असल्यामुळे सिने अभिनेता अजय देवगन हा आपल्या मुलासह मंगळवारी त्रंबकेश्वर राजाच्या चरणी लीन झाला अचानक मंदिरामध्ये अजय देवगन ला बघून भक्तगणांमध्ये देखील आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून त्याचे स्वागत करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर येथे अभिनेते अजय देवगन यांनी देवदर्शनार्थ भेट दिली. यापूर्वी देखील काजोल सोबत अजय देवगन भेट दिलेली होती. त्र्यंबकेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतले श्रावण मास पर्वकाळ साधला त्रंबकेश्वर देवस्थानचे कडून त्यांचे स्वागत केले आणि मंदिराची माहिती दिली. मंदिराचे पुजारी मनोज तुंगार यांनी अजय देवगन यांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चा करून आशीर्वाद दिले. सिने अभिनेता अजय देवगन यांच्याबरोबर त्याचा मुलगा देखील होता. मंदिरामध्ये अचानक अजय देवगन याला बघितल्यानंतर भक्तगणांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. यावेळी अजय देवगन यांनी नागरिकांशी मन मोकळ्या गप्पा देखील मारल्या. काही काळ मंदिर परिसरामध्ये व्यथित केल्यानंतर पुन्हा मुंबईकडे रवाना झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande