आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
रत्नागिरी, 18 ऑगस्ट (हिं.स.) । दीर्घकाळापासून आजारपणाचा त्रास सहन करणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धाने कोतवडे-घारपुरेवाडी (ता. रत्नागिरी) येथे आज सकाळी आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. माधव विष्णू आठवले (वय ६४, रा. घारपुरेवाडी, कोतवडे
आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या


रत्नागिरी, 18 ऑगस्ट (हिं.स.) । दीर्घकाळापासून आजारपणाचा त्रास सहन करणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धाने कोतवडे-घारपुरेवाडी (ता. रत्नागिरी) येथे आज सकाळी आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली.

माधव विष्णू आठवले (वय ६४, रा. घारपुरेवाडी, कोतवडे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आठवले गेल्या काही दिवसांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त होते. आजारपणामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीत ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचे पुतणे प्रसाद पांडुरंग आठवले (वय ४२) यांनी तत्काळ त्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी माधव आठवले गंभीर अवस्थेत आढळून आले. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande