जम्मू-श्रीनगर महामार्गावर सीआरपीएफच्या वाहनाला ट्रकची धडक; ५ जवान जखमी
श्रीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)।दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काझीगुंडच्या लेवदोरा परिसरात मंगळवारी एका ट्रकची सीआरपीएफच्या बंकर वाहनाला धडक बसल्याने अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाल
जम्मू-श्रीनगर महामार्गावर सीआरपीएफच्या वाहनाला ट्रकची धडक; ५ जवान जखमी


श्रीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)।दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काझीगुंडच्या लेवदोरा परिसरात मंगळवारी एका ट्रकची सीआरपीएफच्या बंकर वाहनाला धडक बसल्याने अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी लेवदोरा परिसरात ही घटना घडली. एका ट्रकने सीआरपीएफच्या बंकर वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बंकर वाहन उलटले. या दुर्घटनेत सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले.जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी काझीगुंड येथील सीआरपीएफच्या १६३ बटालियनच्या एमआय रूममध्ये नेण्यात आले. जखमी जवानांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande