स्टील खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ठाण्याच्या दोघांकडून १८ लाख ३४ हजारांची फसवणूक
नाशिक, 18 ऑगस्ट (हिं.स.)। कंपनीसाठी लागणारे स्टीलचे मटेरिअल कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या दोन जणांनी नाशिकच्या उद्योजकाची १८ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी श्रीकांत दिन
स्टील खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ठाण्याच्या दोघांकडून १८ लाख ३४ हजारांची फसवणूक


नाशिक, 18 ऑगस्ट (हिं.स.)। कंपनीसाठी लागणारे स्टीलचे मटेरिअल कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या दोन जणांनी नाशिकच्या उद्योजकाची १८ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी श्रीकांत दिनकर भट (रा. गोविंदनगर, नाशिक) यांची अंबड एमआयडीसीमध्ये श्री गजानन मेटल नावाची कंपनी आहे. आरोपी संदीप राघोबा सावंत व अरविंद रामचंद्र हगवणे (दोघेही रा. बदलापूर, जि. ठाणे) यांनी संगनमत करून मोबाईलद्वारे भट यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या कंपनीस लागणारे स्टीलचे मटेरिअल कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून व स्टील खरेदी- विक्रीचा व्यवसाय करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कमी किमतीत स्टील देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून १८ लाख ३४ हजार १७२ रुपये घेऊन कोणत्याही प्रकारचे स्टील मटेरिअल न देता दिलेल्या रकमेचा अपहार करून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उगले करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande