फास्टॅगच्या नावाखाली दोघांना १६ लाख ३७ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा
नाशिक, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी ऑनलाईन चौकशी केली असता अज्ञात भामट्याने ऑफिशिअल वेबसाईट असल्याचे भासवून दोन जणांना १६ लाख ३७ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती
फास्टॅगच्या नावाखाली दोघांना १६ लाख ३७ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा


नाशिक, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी ऑनलाईन चौकशी केली असता अज्ञात भामट्याने ऑफिशिअल वेबसाईट असल्याचे भासवून दोन जणांना १६ लाख ३७ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांना फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी चौकशी केली असता, तसेच सहफिर्यादी यांची या ई-मित्रा पोर्टल घेण्यासाठी त्यांनी ऑनलाईन रिचार्ज करण्याच्या हेतूने फिर्यादीची व सहफिर्यादीची ऑनलाईन चौकशी केली असता त्यांना ऑफिशिअल वेबसाईट असल्याचे भासविण्यात आले. त्यांच्याकडून नमूदप्रमाणे १६ लाख ३७ हजार ८५३ रुपयांची रक्कम ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन फसवणूक करण्यात आली. याप्रमाणे सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande