सिन्नर - खोपडी येथे महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने लुटले
सिन्नर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। : शेतात काम करणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेवर चाकूने हल्ला करून तिचे दोन्ही कान कापत कानातील व गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने लुटल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १६) दुपारी चार वाजेच्या सुम
सिन्नर - खोपडी येथे महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने लुटले


सिन्नर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। : शेतात काम करणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेवर चाकूने हल्ला करून तिचे दोन्ही कान कापत कानातील व गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने लुटल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १६) दुपारी चार वाजेच्या सुमारास खोपडी खुर्द शिवारात घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे.

खोपडी खुर्द येथील गट क्रमांक १९१ मधील शेतात शैला संपत दराडे (वय ६०) व संगीता दराडे या कांद्याच्या रोपातील गवत काढण्याचे काम करीत होत्या. सायंकाळी चारच्या सुमारास दुचाकीवरून २५ ते २८ वर्षे वयोगटातील तीन अज्ञात तरुण तेथे आले. तिघांनी आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत शैला दराडे यांना चाकूचा धाक दाखविला. त्यांना मारहाण करीत क्रूरपणे दोन्ही कान कापले. त्यांच्या कानातील चार ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, अंदाजे ४० हजार रुपये, तसेच गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, अंदाजे ६० हजार रुपये, असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. संगीता दराडे यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जीवे मारण्याची धमकी

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande