
* Infinity DAO चा मोठा दावा
मुंबई, १९ ऑगस्ट (हिं.स.) : जागतिक डिजिटल अॅसेट बाजारात जोखीम व्यवस्थापन आणि युजर्सच्या सुरक्षिततेला नवे परिमाण देणारे एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित डिसेंट्रलाइज्ड-फायनान्स (DeFi) इकोसिस्टम असलेल्या InfinityDAO ने आपल्या IDL टोकन इकोसिस्टमसाठी तब्बल 1 अब्ज अमेरिकन डॉलर (US$1 billion) मूल्याचा संस्थात्मक स्तरावरील विमा संरक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली आहेत.
मुंबई आणि लंडन येथून 18 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत, युकेस्थित तज्ज्ञ क्रिप्टो इन्शुरन्स सिंडिकेटद्वारे हा संपूर्ण विमा आराखडा तयार केला जात आहे. अंडररायटरची अंतिम मंजुरी, अटी आणि मर्यादांच्या अधीन राहून हा विमा InfinityDAO, तिचे भागधारक आणि पात्र घटकांना बहुस्तरीय सुरक्षा प्रदान करेल. हा 1 अब्ज अमेरिकन डॉलरचा विमा कार्यक्रम मुख्यत्वे पाच महत्त्वाच्या क्षेत्रांचे रक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
पाच प्रमुख क्षेत्रांना मिळणार विम्याचे कवच
टोकन डिफॉल्ट संरक्षण : पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या डिफॉल्टच्या नेमक्या व्याख्येच्या अधीन राहून, IDL टोकनवर परिणाम करणाऱ्या निश्चित विमाकृत घटनांविरुद्ध संरक्षण.
प्लॅटफॉर्म डिफॉल्ट संरक्षण : मूळ InfinityDAO प्लॅटफॉर्म आणि इकोसिस्टीमवर परिणाम करणाऱ्या निश्चित अपयश किंवा विमाकृत डिफॉल्ट घटनांसाठी कव्हरेज.
गुन्हे आणि डिजिटल ॲसेट चोरी संरक्षण: पॉलिसीअंतर्गत कव्हर केलेल्या ठिकाणी, निश्चित चोरी, गुन्हे, सायबरसंबंधित नुकसान तसंच अनधिकृत ॲसेट-हस्तांतरण घटनांविरुद्ध संरक्षण
डायरेक्टर्स आणि ऑफिसर्स दायित्व संरक्षण: पॉलिसीतील शब्दरचनेच्या अधीन राहून, आर्थिक संकट किंवा दिवाळखोरी दरम्यान उद्भवू शकणाऱ्या परिस्थितींसह, पात्र संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्धच्या कव्हर्ड व्यवस्थापन-दायित्व दाव्यांविरुद्ध संरक्षण.
इकोसिस्टीम आणि भागधारक संरक्षण : अंतिम विमा कराराच्या कक्षेत, पात्र वापरकर्ते, भागधारक तसंच प्लॅटफॉर्मच्या मालकी/व्यवस्थापन रचनेसाठी संरक्षण अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली विमा चौकट.
बहुतांश डिजिटल अॅसेट प्रकल्प कोणत्याही थर्ड-पार्टी विम्याशिवाय काम करत असताना, InfinityDAO ची ही US$1 billion ची विमा मर्यादा त्यांना संपूर्ण क्रिप्टो जगतात एक वेगळी ओळख मिळवून देईल
Polygon ब्लॉकचेन आणि 5 मुख्य प्रोटोकॉल मॉड्यूल्स
InfinityDAO आपले IDL युटिलिटी टोकन Polygon ब्लॉकचेन नेटवर्कवर चालवते. ही इकोसिस्टम AI-आधारित आर्थिक व्यवस्थापन प्रणालीवर काम करते, जी टोकनचे वाटप, तरलता (Liquidity), मूल्य रिसायकलिंग आणि दीर्घकालीन शाश्वतता नियंत्रित करते. यासाठी 5 परस्परसंबंधित प्रोटोकॉल मॉड्यूल्स एकत्र काम करतात.
क्रिप्टो बाजारात विश्वासार्हतेचा नवा अध्याय
पारंपरिक वित्तीय बाजारांच्या तुलनेत क्रिप्टो क्षेत्रात तंत्रज्ञान, ताबा आणि सायबर सुरक्षिततेच्या बाबतीत मोठे धोके असतात. तज्ज्ञ विमा कंपन्या आधीच चोरी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांसाठी क्रिप्टो विमा प्रदान करतात. मात्र, हा विमा टोकनच्या किंमतीची, परताव्याची किंवा लिक्विडिटीची कोणतीही हमी देत नाही, तर केवळ विशिष्ट बाह्य आणि ऑपरेशनल धोके विमा कंपनीकडे वर्ग करतो.
InfinityDAO च्या अंतर्गत मूल्यांकनानुसार, हा 1 अब्ज अमेरिक डॉलरचा विमा कार्यक्रम पूर्ण झाल्यास IDL हे जगातील समर्पित विमा संरक्षण असणाऱ्या मोजक्या क्रिप्टो टोकन्सच्या क्लबमध्ये समाविष्ट होईल आणि असा विमा असणारे जगातील 14 वे टोकन ठरू शकेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी