आघाडीची ई-कॉमर्स कंपनी प्रोसुसची नावीमध्ये १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
बेंगळुरू, 19 ऑगस्ट (हिं.स.) - नावी लिमिटेडने आज प्रोसुसकडून 100 मिलियन अमेरिकी डॉलर (USD)च्या गुंतवणुकीची घोषणा केली. नावीच्या या पहिल्या संस्थात्मक भांडवली गुंतवणुकीमुळे भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञानाधारित वित्तीयसेवा संस्थांपैकी एक बनण्याच्या तिच
Navi


बेंगळुरू, 19 ऑगस्ट (हिं.स.) - नावी लिमिटेडने आज प्रोसुसकडून 100 मिलियन अमेरिकी डॉलर (USD)च्या गुंतवणुकीची घोषणा केली. नावीच्या या पहिल्या संस्थात्मक भांडवली गुंतवणुकीमुळे भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञानाधारित वित्तीयसेवा संस्थांपैकी एक बनण्याच्या तिच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. ही प्रस्तावित गुंतवणूक भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मना पाठबळ देण्याच्या प्रोसुसच्या दीर्घकाळापासूनच्या भूमिकेशी सुसंगत आहे. तसेच, नावीचा व्यवसाय, तिची अंमलबजावणीची क्षमता आणि भारतातील आघाडीची तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा संस्था उभारण्याच्या तिच्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षेवरील प्रोसुसचा विश्वासही या गुंतवणुकीतून दिसून येतो. ही गुंतवणूक सचिन बंसल, नॅस्पर्स आणि प्रोसुस समूह यांच्यात गेल्या दशकाहून अधिक काळापासून असलेल्या संबंधांवर आधारित आहे.

या घडामोडीवर भाष्य करताना नावी समूहाचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष श्री. सचिन बंसल म्हणाले, “प्रोसुस हा जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित गुंतवणूकदारांपैकी एक आहे. दीर्घकालीन दृष्टीने श्रेणी निश्चित करणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांना पाठबळ देण्याचा त्यांचा उत्कृष्ट अनुभव आहे. नॅस्पर्स आणि प्रोसुस समूहासोबतचे माझे संबंध दशकाहून अधिक जुने आहेत. त्यामुळे ही भागीदारी माझ्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. त्यांनी नावीमध्ये केलेली गुंतवणूक आम्ही उभारत असलेल्या संस्थेला मिळालेली भक्कम मान्यता आहे. भांडवलाच्या पलीकडे जाऊन, प्रोसुसचा जागतिक दृष्टिकोन, दीर्घकालीन दृष्टी आणि तंत्रज्ञान व्यवसायांचा विस्तार करण्याचा अनुभव यांचा आम्ही आदर करतो. आमचा विकासाचा प्रवास सुरू ठेवताना त्यांच्यासोबत भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

आपले विचार मांडताना प्रोसुस इंडिया इन्व्हेस्टमेंट्स अँड M&Aचे प्रमुख आशुतोष शर्मा म्हणाले, “नावीसोबतच्या भागीदारीबद्दल आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. गुंतवणूक करताना आम्ही ज्या सर्व गुणांचा शोध घेतो, ते या व्यवसायात दिसून येतात. यामध्ये निष्ठावान वापरकर्त्यांचा मोठा आधार, व्यवसायाच्या विविध क्षेत्रांसह प्लॅटफॉर्मचे स्वरूप, समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाला प्राधान्य देणारा दृष्टिकोन आणि उत्तम ग्राहक अनुभव देण्यावर असलेले सातत्यपूर्ण लक्ष यांचा समावेश आहे.

आव्हानात्मक व्यापक आर्थिक वातावरण असूनही, या टीमने गेल्या 12 महिन्यांत अत्यंत उत्कृष्ट अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रातील महत्त्वाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी कंपनीची स्थिती भक्कम झाली आहे.

सचिन यांच्यामध्ये आम्हाला असे संस्थापक दिसतात, जे संयमाने कंपनी उभारणे, उत्तम उत्पादने तयार करणे आणि मोठ्या प्रमाणावर अर्थपूर्ण दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या आमच्या तत्त्वज्ञानाशी सहमत आहेत. आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल. त्यानंतर सचिन आणि नावीच्या दीर्घकालीन विकासाला पाठबळ देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

नावी आपल्या व्यवसायांमध्ये मजबूत कार्यकारी गतीसह विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे. FY26 दरम्यान, नावी UPIने भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत केले. तसेच, देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे UPI ॲप म्हणून आपले स्थान कायम ठेवले.

नावी फिनसर्व्हने ₹130 अब्जच्या पुढे नेले. त्यासोबतच कंपनीने आपल्या कर्ज व्यवसायाचा जबाबदारीने विस्तार सुरू ठेवला. सुधारत जाणाऱ्या आर्थिक स्थितीला आणि वाढत्या कार्यकारी लाभाला मिळालेल्या पाठबळामुळे समूहाने Q4FY26 मध्ये एकत्रित नफा मिळवला. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तोनावीच्या व्यवसाय मॉडेलची ताकद आणि दीर्घकालीन, तंत्रज्ञानाधारित वित्तीय संस्था उभारण्यावर असलेले तिचे लक्ष दर्शवतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande