
छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आतापर्यंत चोरीच्या 28 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणावरून मोटरसायकल चोरी झाली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात देखील तक्रारी आणि गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis