छ.संभाजीनगर : सायरन वाजले आणि सोनाराच्या दुकानात चोरीचा प्रयत्न फसला
छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। एका सोनाराच्या दुकानातील सायरन वाजले आणि सोनाराच्या दुकानात चोरीचा प्रयत्न फसला. वेळीच सर्वजण सतर्क झाले यामुळे मोठा अनर्थ टळला आहे महालगाव परिसरातील एका सोनाराच्या दुकानाचे शटर तोडून मध्यरात्री चोरीचा प्रयत्
छ.संभाजीनगर : सायरन वाजले आणि सोनाराच्या दुकानात चोरीचा प्रयत्न फसला


छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। एका सोनाराच्या दुकानातील

सायरन वाजले आणि सोनाराच्या दुकानात चोरीचा प्रयत्न फसला. वेळीच सर्वजण सतर्क झाले यामुळे मोठा अनर्थ टळला आहे

महालगाव परिसरातील एका सोनाराच्या दुकानाचे शटर तोडून मध्यरात्री चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण गाढ झोप येत असताना चोरट्यांनी कामगिरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुकानातील सुरक्षा सायरन वाजताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने चोरीचा प्रयत्न फसला. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande