राम मंदिर संकुलाचे बहुतांश बांधकाम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता : नृपेंद्र मिश्रा
अयोध्या, २० ऑगस्ट (हिं.स.)श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा अयोध्येत दाखल झाले. ते श्री राम मंदिराच्या बांधकामाशी संबंधित कामाचा आढावा घेण्यासाठी अयोध्येत तीन दिवस घालवतील. त्यांनी बुधवारी संध्याकाळी बांधकाम समितीसोबत बैठक घेत
श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा


अयोध्या, २० ऑगस्ट (हिं.स.)श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा अयोध्येत दाखल झाले. ते श्री राम मंदिराच्या बांधकामाशी संबंधित कामाचा आढावा घेण्यासाठी अयोध्येत तीन दिवस घालवतील. त्यांनी बुधवारी संध्याकाळी बांधकाम समितीसोबत बैठक घेतली. त्यानंतर, गुरुवारी सकाळी सर्किट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना नृपेंद्र मिश्रा यांनी राम मंदिर संकुलात सुरू असलेल्या बांधकामाची माहिती दिली. पुढील महिन्यात ३० सप्टेंबरपर्यंत राम मंदिर संकुलाचे बहुतांश बांधकाम पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मिश्रा म्हणाले की, एल अँड टी आणि टाटाचे कर्मचारी ३० ऑक्टोबरपर्यंत बांधकाम पूर्ण करतील.

यानंतर, प्रामुख्याने सभागृह आणि संग्रहालयाचे काम सुरू राहील. संग्रहालयात एकूण २० दालने बांधली जात आहेत, ज्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. गॅलरी क्रमांक ७ इमर्सिव्ह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मंदिर परिसराचे दिव्य दृश्य सादर करण्याच्या तयारीत आहे. गॅलरी क्रमांक १७ मध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभू रामाचा वनवास आणि नद्यांशी संबंधित दृश्ये दाखवली जातील.आयआयटी मद्रासचे तांत्रिक तज्ञ संग्रहालयाच्या बांधकामात मदत करत आहेत. त्यांनी सांगितले की, मंदिर परिसराभोवतीची संरक्षक भिंत डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सुरक्षा उपकरणे बसवण्यासाठी अतिरिक्त दोन महिने लागतील. एल अँड टी, टाटा आणि सोमपुरा यांसारख्या बांधकाम एजन्सींची देयके आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला, जेणेकरून वर्षाअखेरीस कोणतेही बांधकाम अपूर्ण राहणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande