अमित शाह यांचा काँग्रेसवर निशाणा, 'वंदे मातरम'वरून तुष्टीकरणाचा आरोप
नवी दिल्ली, २० ऑगस्ट (हिं.स.) ''वंदे मातरम'' हे संपूर्ण गीत गाण्याऐवजी केवळ दोन कडवी गाण्याच्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे राष्ट्रविरोधी पाऊल असल्याचे सांगत, काँग्रेस
अमित शाह यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, २० ऑगस्ट (हिं.स.) 'वंदे मातरम' हे संपूर्ण गीत गाण्याऐवजी केवळ दोन कडवी गाण्याच्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे राष्ट्रविरोधी पाऊल असल्याचे सांगत, काँग्रेस पुन्हा एकदा तुष्टीकरण आणि व्होट बँक राजकारणाच्या मार्गावर परतत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अमित शाह म्हणाले की, १९३७ मध्ये काँग्रेसने तुष्टीकरणासाठी 'वंदे मातरम'चे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या राजकारणामुळे द्विराष्ट्र सिद्धांताला बळकटी मिळाली आणि नंतर देशाच्या फाळणीसाठी परिस्थिती निर्माण झाली. ते म्हणाले की, 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त मोदी सरकारने संपूर्ण गीताला कायदेशीर मान्यता देऊन ही ऐतिहासिक चूक सुधारली. शाह यांनी आरोप केला की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा व्होट बँक राजकारणासाठी त्याच तुष्टीकरणाच्या मार्गावर चालत आहे.

अमित शाह यांनी काँग्रेस पक्षाचा हा निर्णय म्हणजे संसदेने केलेल्या कायद्याचा उघडपणे केलेला अवमान असल्याचे म्हटले आहे. त्यांनी देशवासियांना काँग्रेस पक्षाच्या कथित तुष्टीकरणाच्या राजकारणाविरोधात एकजूट होऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 'वंदे मातरम'च्या बाबतीत झालेल्या पूर्वीच्या चुकीचे परिणाम देशाला आधीच भोगावे लागले आहेत आणि अशी चूक पुन्हा होऊ नये.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande