इस्रायलमध्ये भारतीय नागरिकाचा संशयास्पद मृत्यू; एका संशयिताला अटक
नवी दिल्ली , 20 ऑगस्ट (हिं.स.)।इस्रायलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.जेरुसलेममध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिक राजीव आचार्य यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर इस्रायली पोलिसांनी तातडीने कारवाई करत ए
इस्रायलमध्ये भारतीय नागरिकाचा संशयास्पद मृत्यू; एका संशयिताला अटक


नवी दिल्ली , 20 ऑगस्ट (हिं.स.)।इस्रायलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.जेरुसलेममध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिक राजीव आचार्य यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर इस्रायली पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला अटक केली आहे. तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने या घटनेला दुजोरा दिला आहे.

इस्रायलमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. दूतावासाने म्हटले आहे की,घटनेमागील सर्व तथ्ये आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.दूतावासाने सध्या राजीव आचार्य यांच्या मृत्यूचे कारण किंवा घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती उघड केलेली नाही. दुसरीकडे, भारतीय मिशनने मृताच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करत त्यांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, पश्चिम आशियात सातत्याने तणावाचे वातावरण असताना ही घटना घडली आहे. मात्र, या घटनेचा प्रादेशिक तणावाशी काही संबंध आहे किंवा नाही, हे भारतीय दूतावासाने स्पष्ट केलेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande