पेलेट गन हल्ला विद्यार्थी जखमी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास दिल्ली पोलिसांची तयारी
* राहुल गांधींची मागणी अखेर मान्य नवी दिल्ली, २१ ऑगस्ट (हिं.स.) : जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला. त्याच्या समर्थनार्थ आणि एफआयआर दाखल करण्याच्या आग्रही मागणीसाठी काँग्रेस नेते आणि खासदा
Rahul Gandhi


* राहुल गांधींची मागणी अखेर मान्य

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट (हिं.स.) : जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला. त्याच्या समर्थनार्थ आणि एफआयआर दाखल करण्याच्या आग्रही मागणीसाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. पोलिसांच्या अपयशाबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे. दरम्यान, गेल्या पाच तासापासून सुरू असलेल्या राहुल गांधी यांच्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांची मागणी मान्य करत अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी तयारी दर्शवली आहे.

जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाईची आम्हाला खात्री मिळत नाही, तोपर्यंत आम्ही भूमिकेवर ठाम आहोत, असे म्हणत तब्बल साडेपाच तासापासून राहुल गांधी यांनी जखमी विद्यार्थ्याबरोबर आंदोलन केले. अखेर या आंदोलनाला यश आलं आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राजवटीत शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर उघडपणे पेलेट गनने गोळीबार केला जाऊ शकतो, पण त्यांना न्याय मिळू शकत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

काय आहे पार्श्वभूमी

20 जुलै 2026 रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात साहिल लोचव हा तरुण व इतर काही जण गंभीर जखमी झाले होते. पीडित तरुणाच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे व डोळ्यात तीन छर्रे रुतल्याचा वैद्यकीय अहवालात दावा करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande