भाजप देखील ‘जेन-झी’ मतदारांपर्यंत पोहचणार
पक्षाने स्थापन केली तरुण नेत्यांची समिती नवी दिल्ली, 22 ऑगस्ट (हिं.स.) : देशातील युवा पिढी आणि विशेषतः जनरेशन झेड मधील नव्या मतदारांशी थेट संवाद प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने तरुण मतदा
स्मृती ईराणी, नितीन नवीन, विनोद तावडे


पक्षाने स्थापन केली तरुण नेत्यांची समिती

नवी

दिल्ली, 22 ऑगस्ट (हिं.स.) : देशातील युवा पिढी आणि विशेषतः जनरेशन झेड मधील नव्या मतदारांशी थेट संवाद प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष ‘जेन-झी आउटरीच प्रोग्राम’ची रणनीती आखली आहे.या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पक्षाने वरिष्ठ आणि युवा नेत्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय टीम स्थापन केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या टीममध्ये राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे, गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी तसेच छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.तरुणांच्या आकांक्षा, रोजगाराशी संबंधित चिंता आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ही टीम थेट संवादाचे विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. अनुभवी रणनीतिकार आणि युवा नेतृत्व यांच्यातील समन्वयातून जेन-झी पिढीपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, विरोधकांकडूनही युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध शहरांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी आणि तरुणांशी थेट संवाद साधत आहेत.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय टीमची पहिली औपचारिक बैठक घेतली. या बैठकीची सुरुवात राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या सर्व सहा कडव्यांच्या गायनाने झाली.बैठकीत पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विरोधकांना विविध मुद्द्यांवर घेरण्यासाठी पक्षाची पुढील रणनीती काय असावी, यावरही विचारविनिमय करण्यात आला.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande