केंद्र सरकारने चार वर्षांखालील मुलांसाठी क्लोरफेनिरामाइन-फेनिलेफ्राइन मिश्रित औषधांवर घातली बंदी
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्र सरकारने मुलांच्या सुरक्षेचा विचार करून सर्दी-खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्रिन हायड्रोक्लोराइड यांचे मिश्रण असलेल्या सर्व फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांच्या उत्पादन, विक
Ban FDC Medicine Children


नवी दिल्ली, 22 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्र सरकारने मुलांच्या सुरक्षेचा विचार करून सर्दी-खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्रिन हायड्रोक्लोराइड यांचे मिश्रण असलेल्या सर्व फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर नवीन निर्बंध लागू केले आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ही औषधे दिली जाणार नाहीत.

शनिवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या औषधांच्या लेबल, पॅकेज इन्सर्ट आणि प्रचार साहित्यावर इशारा देणे अनिवार्य असेल. यापूर्वी 15 एप्रिल 2025 रोजी काही निवडक एफडीसी औषधांवर हा प्रतिबंध लागू करण्यात आला होता. आता सरकारने त्याची व्याप्ती वाढवत क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्रिन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व एफडीसी औषधांना या नियमाच्या कक्षेत आणले आहे.

सरकारने हा निर्णय तज्ज्ञ समिती आणि ड्रग्स टेक्निकल एडवाइजरी बोर्डच्या शिफारशींच्या आधारे घेतला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये या औषधांच्या वापरामुळे धोका निर्माण होऊ शकतो, तर त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. हा आदेश ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 च्या कलम 26 ए अंतर्गत सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी जारी करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande