
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टद्वारे राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले, ''चला, आणखी मोठी स्वप्ने पाहूया. आणखी अधिक इनोव्हेशन करूया आणि नव्या सीमा पार करूया...।'' विक्रम लँडरच्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी 26 ऑगस्ट 2023 रोजी बेंगळुरू येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मुख्यालयाच्या आपल्या भेटीदरम्यान 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
वर्ष 2023 मध्ये 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्राच्या ध्रुवाजवळ चांद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारत हा चंद्रावर अंतराळयान उतरवणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरला. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी प्रज्ञान रोव्हरलाही चंद्रावर उतरवले. पंतप्रधानांनी म्हटले होते की, या ऐतिहासिक मोहिमेच्या निष्कर्षांचा आगामी काळात मानवतेला फायदा होईल.
इस्रोने आज म्हटले, ''आम्ही आज आपल्याला आमच्यासोबत राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. तसेच भारताला आघाडीची अंतराळ शक्ती बनवण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करूया.''
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule