बीड - धारूर तालुक्यातील मौजे सुकळी गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला आता गती
बीड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। गुणवती बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत धारूर तालुक्यातील मौजे सुकळी गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. सुकळी येथील गावठाणातील जुन्या घरांचे व खुल्या जागांचे शासनाच्या नियमानुसार मूल्यांकन करण्यात आल्यानंतर
प्रकाश सोळंके


बीड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। गुणवती बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत धारूर तालुक्यातील मौजे सुकळी गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. सुकळी येथील गावठाणातील जुन्या घरांचे व खुल्या जागांचे शासनाच्या नियमानुसार मूल्यांकन करण्यात आल्यानंतर त्याआधारे अॅडव्हान्स मावेजा वाटपाचा कार्यक्रम माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडला.

माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते सुकळी येथील २०९ पात्र लाभार्थ्यांना सुमारे २ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स मावेजा वितरित करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी एन. एस. होसाळे, स.अ. श्रेणी-२, टी. ए. नागगोजे, कनिष्ठ अभियंता, व्ही. डी. गिरासे, स्था.अ.स., लघु पाटबंधारे उपविभाग, परळी वैजनाथ यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सुकळी गावातील जुन्या घरांचे व जागांचे मूल्यांकन करून त्यानुसार मावेजा देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. 20 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनातील मावेजाच्या प्रश्नाला आता मार्ग मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमास सुकळी गावचे सरपंच संतोष सौंदनकर, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

दरम्यान, आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी सुकळी गावच्या पुनर्वसनातील उर्वरित प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. राहिलेला

मावेजा, पुनर्वसित ठिकाणी आवश्यक नागरी सुख-सुविधा तसेच पुनर्वसित जागेसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. सुकळी गावाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने अॅडव्हान्स मावेजा वाटपाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही नियमानुसार मावेजा मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande