नांदेडमध्ये ६ सप्टेंबरला भव्य सार्वजनिक दहीहंडी महोत्सव
नांदेड, २५ ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, महानगर नांदेड आणि भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आशुतोष अमरनाथ राजूरकर यांच्या आयोजनातून सार्वजनिक दहीहंडी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहण्य
अ


नांदेड, २५ ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, महानगर नांदेड आणि भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आशुतोष अमरनाथ राजूरकर यांच्या आयोजनातून सार्वजनिक दहीहंडी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांची माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या समवेत भाजपा आमदार अमर राजूरकर यांनी भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. यावेळी सार्वजनिक दहीहंडी महोत्सवाचे आयोजक डॉ. आशुतोष अमरनाथ राजूरकर उपस्थित होते.

यंदाच्या दहीहंडी महोत्सवात भव्य आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दहीहंडी महोत्सवाची माहिती

प्रथम पारितोषिक: ₹३,३३,३३३/-

दिनांक: रविवार, ६ सप्टेंबर २०२६

वेळ: सायंकाळी ५ वाजता

स्थळ: यशवंत कॉलेज मैदान, नांदेड

नांदेडकरांनी या भव्य सार्वजनिक दहीहंडी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande